Wikipedia

Search results

Wednesday, 26 July 2017

ट्रेकर कुणाला म्हणाव......

ट्रेकर कुणा म्हणू मी!

काल एका ठिकाणी वाचलं,नविन पावसात बेडूक निघावेत तसे नवीन ट्रेकर पावसात फिरायला निघतात, आणि डोक्यात एकदम विचार सुरु झाले खरंच त्यांना ट्रेकर म्हणावं का ?

खूप वेळा प्रसारमाध्यमं फिरायला जाणाऱ्या सगळ्यांना ट्रेकर म्हणतात. आता यांना खरा ट्रेकर कोण समजून सांगणार?
खरंच, अशा लोकांना ट्रेकर म्हटलं तर काय वाटत असेल, आपलं संपूर्ण आयुष्य या कामासाठी व्यतीत केलेल्या लोकांना? काय वाटत असेल आज जे हयात नाहीत त्या लोकांच्या आत्म्यांना? त्यांना किती यातना होत असतील. ते फक्त आणि फक्त एक खरा ट्रेकरच जाणू आणि अनुभवू शकतो.
जसं पंढरपूर ची वारी म्हटलं कि वारकरी जीव कि प्राण एक करून त्या वारीत, त्या दैवी कामात सहभागी होऊन आपलं तन मन धन समर्पित करत असतो. त्यावेळी तो फक्त वारकरी असतो. ना मालक ना कामगार, ना बाप ना मुलगा , ना गरीब ना श्रीमंत. तो असतो फक्त नि फक्त एक वारकरी. अशी हि वारी प्रत्येक वारकरी जगत असतो नि अनुभवत असतो . पण ट्रेकर च्या बाबतीत हि असं असू शकतं हे फक्त एका खऱ्या ट्रेकरलाच समजू शकतं. खरा ट्रेकर हा देखील एक वारकरीच असतो . पण वर्षातून अनेक वेळा तो हि वारी अनुभवत असतो नि  जगत असतो .
पाऊलखुणा व्यतिरिक्त काही मागे न उरो , झाडाच्या पानालाही इजा न होवो याची काळजी करणारा. निसर्गाच्या सान्निध्यात आपला तन मन धन विसरणारा हा वारकरी कुठं? नि दारू पिऊन मदोन्मत्त हत्ती सारखे हुंदडणारे पर्यटक कुठं? का यांना सगळे एका पंक्तीला बसवायचा प्रयत्न करत आहेत. हे कुठंतरी थांबायला हवं असं कुठंतरी वाटलं म्हणून लिहावं वाटलं इतकंच.

"आई मी ट्रेकिंग ला जाणार आहे." एवढंस सांगून देखील लगेच  हो पण नीट जा! म्हणणारी आई इतर वेळी कुठं जाऊ का? म्हणल्यावर किती आढेवेढे घेऊन होकार देते. हे आपल्या सगळ्यांना चांगलंच माहित आहे. मुलगा ट्रेकिंग ला जातो उनाडक्या करत हिंडत नाही यात बापाला अभिमान असतो . मित्रांमध्ये कायम याच्या ट्रेकिंग गप्पा प्रिय.
परवा एक मित्र सहज बोलता बोलता म्हणाला. बायकोला ट्रेकला नेलं अाता तिला कमीतकमी असं वाटणार नाही की नवरा उगीचच नको त्यांच्यासोबत हिंडत नाही. ट्रेकर विषयी एक आदरभाव आहे मनात, आजतरी सगळीकडे पण…हे चित्र बदलू नये असं वाटत असेल तर ह्या सगळ्यांना ट्रेकर म्हणणं कूठंतरी थांबलं पाहीजे.
या सगळ्या दुर्घटना, ट्रेकर दरीत कोसळला , वाहून गेला , अडकून बसला असं म्हणणाऱ्यांना हे कोण सांगणार कि बाबा रे ही जात वेगळी आहे. ते ट्रेकर्स असूच शकत नाही (अपवाद सोडता). बरं पण मग यांना वाचवायला कोण येतात? तर, ट्रेकर!! कारण, सह्याद्रीत मोकळेपणाने फिरू शकतात फक्त वाघ अाणि मावळेच. हे जीवाचं रान करून मदत करणारे वाघ कुठं, नि सेल्फी च्या मोहात पोरींपूढं शायनिंग मारून कपाळमोक्ष करून घेणारे थिल्लर हिरो कुठं? काहीतरी साम्य अाहे का?
अगदी साधं उदाहरण म्हणजे अापल्या खर्चात काटकसर करून ट्रेकींगसाठी चांगलं पुस्तक अथवा उपकरण घ्यायचा विचार करणारे ट्रेकर्स कुठं, नि तोच वरखर्च दारुपार्ट्यांमध्ये उधळून मौजमजा करत फिरणारे कुठं? यात काहीच फरक नसावा???
पक्षांचा,वाहत्या पाण्याचा,बेधूंद वार्याचा,रात्रीच्या एकांताचा मंजूळ अावाज अनूभवता यावा म्हणून भटकणारा सौंदर्यवेडा कुठं, नि कर्कश अावाजाने या सगळ्या शांततेचा भंग करून बेधूंद होऊन तरूणाईच्या गर्दीत हरवलेला बाबूराव कुठं? काहीतरी ताळमेळ अाहे का?
निसर्गाला अोरबाडायला जाल तर, तो कधी तूमचा काळ बनेल त्याची तुम्ही कल्पना पण करू शकणार नाही. पण तेच जर त्याला सांभाळत, जपत त्याच्या सोबतीची सवय करून घ्याल तर, त्याच्यासारखा सुंदर, परोपकारी मित्र तुम्हाला शोधून सापडणार नाही.

Saturday, 10 June 2017

R to R(Rajgad to Raigad) via torna, lingana,boratyachi naal

 ट्रेकिंग अर्थात भटकंती च्या युगात मी तसा नवखाच.....
साधारणतः ७ ते ८ वेळेस गडकिल्ल्यांची सर केलेली......ह्या लेखात ३ दिवसांच्या तंगडतोड R to R (राजगड ते रायगड ) मोहिमेतील मौज, खडतर प्रसंग,गमतीचे प्रसंग व्यक्त करतो.


पुणे ते राजगड पायथा (गुंजवणे गाव )

दि.:२६.०५.२०१७   वेळ: ०५.०० PM 
                     ठरल्याप्रमाणे स्वारगेट ल पोहचलो. जरा उशीर च झाला होता. घाई त च प्लॅटफॉर्म च्या दिशेने विचारपूस करत  जात च होतो तेवढ्यात मागून आवाज आला पृथ्वी....!!!
मागे बघताच आमचे leader विकी यांचे दर्शन झाले. सोबतच co-leader राहुल ह्यांचे पण.......
Hi-Hello झाल्यावर एमएलए समजलं की फक्त ३ घे च आहोत. बाकीचे कटाम  झाले. त्यानंतर ५.३० च्या
गुंजवणे बस ने मोहिमेस प्रारंभ केला. प्रवासात भटकंती च्या गप्पा झाल्या आणि जरा ओळख पण....
दोघे अनोळखी असल्याने मी जरा शांत च होतो सुरूवातीस.... मात्र ३ दिवसात पक्के जिगरी मित्र झालो. 😉
७.३० ल गुंजवणे गावात पोहचलो. जाताना बाजार दिसला. गावातच महादेवाच्या मंदिरात जरा विश्रांती घेतली व नाश्ता केला. पाण्याचा साठा घेऊन पायथ्याशी असलेल्या check post वर  entry register केली गावकार्‍यांशी वाटेचा आढावा घेऊन चोरवाटेच्या दिशेने मार्गक्रमण केले.

                      पायवाट, दगड, जंगल असा एकंदरीत रस्ता...... १५-२० मि. ने पुढे घनदाट जंगलात गेल्यावर काजव्यांनी आम्हाला घेरून टाकलं ..... काही विशिष्ट झाडावर लुकलुकणार्‍या काजव्यांनी जणू मैफिल च सजवलेली..... माझ्या आयुष्यातला तो पहिलाच काजवा मोहत्सव............साक्षात स्वर्गाची अनुभूती...... सुरूवातीस च असं मनमोहक दृश्य बघून हुरूप आला त्यानंतर JBL च्या तालावर पायांना वेग दिला. गप्पा, अनुभव, वाटेत चालूच होते.... ११ वाजता १का पठारावर पोहचलो. आम्ही जायच्या १ दिवस आधी म्हणजे २५ मे ल अमावस्या होती त्यामुळे आज काळोखात राजगड जरा अस्पष्ट च दिसत होता. जरा पुढे गेल्यावर पद्मावती माची कडा नजरेस पडली. आता आमचे leader विकी ने सूचना दिली कठीण चढाई आहे आता काळजीपूर्वक सावकाश जाऊया, अवघड patches आहे काही..... अंधार्‍या रात्री कातळावर जपून पद्मावती माची चोरदरवाज्याने सर केली


 राहुल पोटे आणि मी (पृथ्वीराज शिंदे )- चोरदरवाजा, पद्मावती माची,रायगड 


विकी आनंदकर - चोरवाट , रायगड