ट्रेकिंग अर्थात भटकंती च्या युगात मी तसा नवखाच.....
साधारणतः ७ ते ८ वेळेस गडकिल्ल्यांची सर केलेली......ह्या लेखात ३ दिवसांच्या तंगडतोड R to R (राजगड ते रायगड ) मोहिमेतील मौज, खडतर प्रसंग,गमतीचे प्रसंग व्यक्त करतो.
पुणे ते राजगड पायथा (गुंजवणे गाव )
दि.:२६.०५.२०१७ वेळ: ०५.०० PM
ठरल्याप्रमाणे स्वारगेट ल पोहचलो. जरा उशीर च झाला होता. घाई त च प्लॅटफॉर्म च्या दिशेने विचारपूस करत जात च होतो तेवढ्यात मागून आवाज आला पृथ्वी....!!!
मागे बघताच आमचे leader विकी यांचे दर्शन झाले. सोबतच co-leader राहुल ह्यांचे पण.......
Hi-Hello झाल्यावर एमएलए समजलं की फक्त ३ घे च आहोत. बाकीचे कटाम झाले. त्यानंतर ५.३० च्या
गुंजवणे बस ने मोहिमेस प्रारंभ केला. प्रवासात भटकंती च्या गप्पा झाल्या आणि जरा ओळख पण....
दोघे अनोळखी असल्याने मी जरा शांत च होतो सुरूवातीस.... मात्र ३ दिवसात पक्के जिगरी मित्र झालो. 😉
७.३० ल गुंजवणे गावात पोहचलो. जाताना बाजार दिसला. गावातच महादेवाच्या मंदिरात जरा विश्रांती घेतली व नाश्ता केला. पाण्याचा साठा घेऊन पायथ्याशी असलेल्या check post वर entry register केली गावकार्यांशी वाटेचा आढावा घेऊन चोरवाटेच्या दिशेने मार्गक्रमण केले.
पायवाट, दगड, जंगल असा एकंदरीत रस्ता...... १५-२० मि. ने पुढे घनदाट जंगलात गेल्यावर काजव्यांनी आम्हाला घेरून टाकलं ..... काही विशिष्ट झाडावर लुकलुकणार्या काजव्यांनी जणू मैफिल च सजवलेली..... माझ्या आयुष्यातला तो पहिलाच काजवा मोहत्सव............साक्षात स्वर्गाची अनुभूती...... सुरूवातीस च असं मनमोहक दृश्य बघून हुरूप आला त्यानंतर JBL च्या तालावर पायांना वेग दिला. गप्पा, अनुभव, वाटेत चालूच होते.... ११ वाजता १का पठारावर पोहचलो. आम्ही जायच्या १ दिवस आधी म्हणजे २५ मे ल अमावस्या होती त्यामुळे आज काळोखात राजगड जरा अस्पष्ट च दिसत होता. जरा पुढे गेल्यावर पद्मावती माची कडा नजरेस पडली. आता आमचे leader विकी ने सूचना दिली कठीण चढाई आहे आता काळजीपूर्वक सावकाश जाऊया, अवघड patches आहे काही..... अंधार्या रात्री कातळावर जपून पद्मावती माची चोरदरवाज्याने सर केली
क्रमश:.......................

दि.:२७/०५/२०१७ वेळ १२.०० AM
चोरदरवाज्यातून प्रवेश केल्यावर पायर्या दिसल्या. त्या सर केल्यानंतर पद्मावती तलावाचे दर्शन झाले. उन्हाळ्याचे दिवस चालू होते मात्र थंड हवा थकव्या कायेला स्पर्श करून विसावा देत होती. जवळच असलेल्या पद्मावती मंदिराच्या प्रवेशावर गेलो. दरवाजा ठोठावला........ आज्जीनी दरवाजा उघडून स्वागत केले. गाभार्यात प्रवेश केला, गिर्यारोहणाचे समान आत ठेवले. बाहेर येऊन फ्रेश झालो. रात्रीचा निसर्ग बघितला. त्यानंतर मंदिरात जाऊन घरून आणलेल्या जेवणावर ताव मारला. .व उद्याच्या मोहिमेची माहिती जाणून घेतली......सकाळी लवकर ऊन जास्त होण्याच्या आत तोरण्याकडे मार्गक्रमण करण गरजेचं होते.......झोपताना विकी ने राजगड च्या जुन्या आठवणी सांगितल्या...आठवणी ऐकत च पद्मावती देवीच्या चरणास झोपी गेलो.
दि.:२७/०५/२०१७ वेळ ०५.१५ AM
No comments:
Post a Comment