Wikipedia

Search results

Tuesday, 8 October 2024

 विहंगम सह्याद्री 




सह्याद्री एख्याद्या पक्ष्याच्या नजरेने कसा दिसेल ह्याच कुतूहल फार आधीपासून च  होत.त्याचप्रमाणे तेव्हा फार कमी ऐरिअल व्हिएव बघायला मिळायचे 


                            इंजिनियरिंग पूर्ण झाल्यावर  आम्हा मित्रांचा  सहजच विचार झाला आणि ह्या विहंगम  प्रवासाला सुरुवात झाली . हेच बघायचं म्हणून घराजवळ च असलेल्या इंद्राई किल्ल्यावर जाण्याचा बेत आखला  आणि पहिल्या वाहिल्या नवीन  ड्रोनच जोरदार  उदघाटन दुर्ग   इंद्राई च्या कातळाकड्यावर  झालं. इंद्राई च्या पायरीमार्गावरील काटकोन ट्रोकोनातील वरील कातळभिंतीवर तो आदळला.  तेव्हा इत्यंभूत माहिती नसल्याने आणि gps सिग्नल कमी असल्याने हा प्रकार घडला. मी आणि माझे मित्र पुढे काय करायचे याचा विचार करत होतो.शेवटी घरी सांगायाचे नाही असं मीच ठरवलं. आयुष्यात पहिल्यांदा एखादी किमती गोष्ट गमावण्याने काय होत हे त्यावेळी  समजल. 


 त्यानंतर पुलं काळ MIDC मध्ये काम करून रिपेरिंग च्या पैशाची जुळवाजुळव केली.मनाची ईच्छा  नसतांना  तब्बल ८ महिने मी कम्पनीची  फरशी मी झिजवत होतो. बरोबर १ मे महाराष्ट्र दिवस व कामगार दिवसाचे औचित्य साधून जॉब सोडला. त्यानंतर हि घोडदौड  थांबण्याचा योग्य कधी आलाच नाही. 


तस बघायला गेलं हि काही कमी जोखमीची गोष्ट नाहीय, हे एक  असं उपकरण आहे त्यावर तुमचं थेट नियंत्रण नसत. काही तांत्रिक बिघाड झालाच तर त्याला रोखणं हे आपल्या हातात नसत त्यामुळे अत्यंत जपून आणि पूर्ण माहिती घेऊन च भरारी घ्यायला हवी.


No comments:

Post a Comment